TTK Group
News & Updates
Mar 25, 2023
Digital and Digital Category 2
टीटीके प्रेस्टिज – स्वच्छ निओ गॅस स्टोव्ह, सुलभपणे साफसफाई करता येण्यासाठी लिफ्टेबल बर्नर्स असलेला गॅस स्टोव्ह
टीटीके प्रेस्टिज या देशातील अग्रगण्य किचन अप्लायन्स ब्रॅण्डने नाविन्यतेप्रती आपल्या कटिबद्धतेशी बांधील राहत त्यांचा स्वच्छ निओ गॅस स्टोव्ह लॉन्च केला. सुलभ व सुरक्षित साफसफाईसाठी नवीन स्वच्छ निओमध्ये लिफ्टेबल बर्नर्स आहेत, जे जलदपणे साफसफाई करण्याची खात्री देतात.
देशभरातील व्यापक संशोधनाला प्रतिसाद म्हणून या आविष्काराची संकल्पना करण्यात आली होती, ज्यावरून निदर्शनास आले की वापरानंतर गॅस स्टोव्ह साफ करण्याच्या अडचणीमुळे गृहिणी अधिकाधिक निराश होत आहेत. लिफ्टेबल बर्नर्ससह टीटीके प्रेस्टिजच्या स्वच्छ निओ गॅस स्टोव्हने ग्राहकांच्या त्रासांचे निराकरण केले. यामधून सुरक्षित व सुलभ साफसफाई प्रक्रियेची खात्री मिळते.